महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Flower Crop : सततचा पाऊस आणि रोगाचा फ्लॉवर पिकाला फटका, शेतकऱ्यावर पिक उपटून टाकण्याची वेळ - crop completely damaged due rain

Flower Crop: सतत पडणाऱ्या पावसामुळे उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने संतप्त होत येवला तालुक्यातील रायते येथील तरुण शेतकरी शंकर ढिकले यांनी फ्लॉवरचे पीक उपटून फेकून Flower Crop दिले आहे. अक्षरशः शेतकऱ्यांनी पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून फ्लॉवरचे पीक उभे केले केले होते. मात्र केलेला खर्च देखील या शेतकऱ्याचा वसूल न झाल्याने पूर्ण पीक खराब झाल्याने अक्षरच्या उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

Flower Crop
Flower Crop

By

Published : Oct 6, 2022, 4:56 PM IST

नाशिक: सतत पडणाऱ्या पावसामुळे उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने संतप्त होत येवला तालुक्यातील रायते येथील तरुण शेतकरी शंकर ढिकले यांनी फ्लॉवरचे पीक उपटून फेकून Flower Crop दिले आहे. अक्षरशः शेतकऱ्यांनी पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून फ्लॉवरचे पीक उभे केले केले होते. मात्र केलेला खर्च देखील या शेतकऱ्याचा वसूल न झाल्याने पूर्ण पीक खराब झाल्याने अक्षरच्या उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

शेतकऱ्यावर पिक उपटून टाकण्याची वेळ

फ्लॉवर पीक उपटलेयेवला तालुक्यातील रायते गावातील तरुण शेतकरी शंकर ढिकले यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये फ्लॉवरचे पीक घेतले होते. हे पीक उभे करण्याकरता अक्षरशः या तरुण शेतकऱ्याने आपल्या पत्नीचे व आईचे मंगळसूत्र गहाण ठेवून भांडवल उभे केले होते. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे पीक पूर्णपणे खराब झाल्याने crop completely damaged due rain केलेला उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल होऊ लागले आहे. या शेतकऱ्याने हे उभं फ्लॉवरचे पीक उपटून फेकून दिले आहे. आता गहाण ठेवलेले सोनं कसं सोडवावं असा मोठा प्रश्न या शेतकऱ्यावर पडला आहे.

पावसाची उघड न मिळाल्यानेआसमानी संकटाने परत एकदा शेतकरी भरडला गेला आहे. या शेतकऱ्याने दीड एकर शेतीमध्ये फ्लॉवरची लागवड केली होती. चांगलं उत्पन्न मिळेल, या आशाने राबराब राबत या शेतकऱ्याने संपूर्ण कुटुंबासोबत पीक घेतले. याकरता या शेतकऱ्याला भांडवल कमी पडल्याने अक्षरशः या शेतकऱ्याने पत्नी व आईचे मंगळसूत्र गहाण ठेवून भांडवल उभे केले व त्याद्वारे मजुरांचे तसेच औषधांचा खर्च या पिकावर केला. ज्यावेळेस पीक निघण्यास सुरुवात झाली. त्यावेळेस सतत पाऊस कोसळत असल्याने एक दिवस सुद्धा पावसाची उघड न मिळाल्याने आलेलं फ्लावरचं पीक हे खराब होऊ लागलं. मार्केटला नेऊन देखील पैसे मिळत नसल्याने अक्षरशः या हाताश झालेल्या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासमोर खुरप्याच्या साह्याने पूर्ण दीड एकर फ्लॉवरचे पीक नष्ट करून फेकून दिले आहे .पावसाचा फटका या फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्याला बसला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details