येवला (नाशिक) - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते,
असे विधान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी येवल्यातील भाजपच्या वतीने करण्यात आली.
येवल्यात भाजपच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध- भारतीय जनता पार्टी येवला यांच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी चौफुली (विंचूर चौफुली) येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध करण्यात आला.
गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात जोडलेले चॅट हा गंभीर पुरावा आहे. ते स्वत: पोलीस दलातील अधिकारी असून त्यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. ज्याप्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागात धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहेत. त्यामुळे पोलीस दलाचं खच्चीकरण होताना दिसत आहे. गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, असे विधान येवला शहराध्यक्ष तरंग गुजराथी यांनी केले.
हेही वाचा-गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा