नाशिक -शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात नवीन नाशिक भागामध्ये घरफोडी चोरी चेन स्नॅचिंग यांसारख्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना आता या चोरट्यांनी दुकानांकडे आपला मोर्चा वळवला आहे. गेल्या आठवड्यातच नवीन नाशिक भागातील इंदिरानगर परिसरामध्ये असलेल्या एका वाईन शॉपी वर डल्ला मारत चोरट्यांनी लाखो रुपयांचा मद्यसाठा लांबल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा मोबाईलचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून लवकरात लवकर या चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नुकसानग्रस्त व्यावसायिकाने केली आहे.
इंदिरानगरला मोबाईल दुकान फोडून सुमारे आठ लाखांचा ऐवज लंपास - नाशिक पोलीस बातमी
नाशिक शहरातील इंदिरानगरमध्ये मोबाईल दुकान फोडुन आठ लाखांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
इंदिरानगरला मोबाईल दुकान फोडून सुमारे आठ लाखांचा ऐवज लंपास
पोलिसांनी कठोर उपाययोजना कराव्यात -
चोरट्यांनी दुकानातील महागडे मोबाइल फोन्स,राऊटर, यांसह अनेक उपकरणे चोरून नेली असून या वाढत्या घटनांना लगाम लावण्यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिक तसेच व्यावसायिकानी केली आहे. अनेक महिन्यांपासून या घटना वाढतच असल्याने पोलीसच गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्यामुळे हे प्रकार वाढत असल्याची चर्चा सध्या नवीन नाशिक भागात सुरू आहे.