नाशिक - शहरात सर्वधिक कोरोनाचा प्रादुर्भाव बंगले आणि अपार्टमेंटमध्ये दिसून येत आहे. अनेक नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत नाही. त्यामुळे नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या तुलनेत झोपड्यांत कमी प्रादुर्भाव दिसून येत आहे.
शहरात 46 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण 669 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हजार 996 जण कोरोनामुक्त झाले आहेत. टाळेबंदीनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर दिसत आहेत. तसेच बाजारपेठेतदेखील गर्दी दिसून येत आहे. अनेक नागरिक कोरोनाचा नियम टाळण्यासाठी असलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
शहरात सद्यस्थितीत 4 हजार 433 रुगण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर 2 हजार 67 प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. यात विशेष म्हणजे 1 हजार 161 अपार्टमेंट व 829 बंगल्याचा समावेश आहे. अनेक नागरिक समाजात वावरताना सरकारने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सोशल डिस्टनसिंग, मास्क आणि स्वतःच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे या सूचनांचा समावेश आहे.