नाशिक - पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यात नाशिकसह काही तालुक्यांत अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी 28 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीच्या काळात खबरदारी बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली..
रविवारी सायंकाळी ओडिशा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर गुलाब चक्रीवादळ धडकले. बंगालच्या उपसागरात एक नाव उलटून दोन मच्छिमारांचा मृत्यू झाला तर एक जण बेपत्ता आहे. अशात प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार 27 व 28 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात 'गुलाब'चा प्रभाव.. अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन - rain update in nasik
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यात नाशिकसह काही तालुक्यांत अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हे ही वाचा -Audio Clip Viral : आरोग्य सेवा भरतीत घोटाळा.. पदासाठी 15 लाखांपर्यंत बोली, ओबीसी नेत्याचा आरोप
तसेच पूरप्रवण क्षेत्रातील गावांनी सावधानतेच्या अनुषंगाने नदी-नाले काठच्या परिसरातील लोकांनी सतर्क राहावे. तसेच नदी व धरण पात्रात कोणी उतरू नये, त्याचप्रमाणे आपले पशुधन, वाहने सुरक्षित स्थळी ठेवावीत. अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने सर्व पूरप्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहेत. सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.