नाशिक - गेला महिनाभरापासून नाशिक शहर परिसरामध्ये अवैध मद्य वाहतूक आणि अवैधरित्या गुटखा साठवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. दरम्यान हे प्रकार रोखण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाने अवैधपणे गुटखा साठवणूक करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले असून अशाच गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी सकाळच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरी रोड भागातील मखमलाबाद लिंक रोडवर असलेल्या एका सोसायटीमधील घरावर छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
अवैधरित्या साठवलेला गुटखा जप्त, नाशिकच्या दिंडोरी रोड परिसरात कारवाई - Nashik crime news
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी सकाळच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरी रोड भागातील मखमलाबाद लिंक रोडवर असलेल्या एका सोसायटीमधील घरावर छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
gutka
शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो कुठून?
या कारवाईत अन्न व औषध विभाग अधिकाऱ्यांनी रजनीगंधा, आर. एम. डी., राजनिवास, विमल यांसह विविध कंपन्यांचा पान मसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत केले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. मात्र नाशिक शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि मद्यसाठा येतो कुठून, हा प्रश्न नागरिकांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे.