नाशिक - मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोकं वर काढलं असून आता अवैध गांजाची तस्करी होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सातपूर विभागातील प्रबुद्ध नगर परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून ५० हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. विशाल पवार आणि अनिल येडेकर असे संशयितांचे नाव आहे.
सातपूर परिसरात गांजा विक्रेत्यांना अटक; सापळा रचून दोघांना केले गजाआड - weed in nashik
मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोकं वर काढलं असून आता अवैध गांजाची तस्करी होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सातपूर विभागातील प्रबुद्ध नगर परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून ५० हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. विशाल पवार आणि अनिल येडेकर असे संशयितांचे नाव आहे.
सातपूर विभागातील प्रबुद्ध नगर परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
सातपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी प्रबुद्ध नगर या ठिकाणी अवैधरीत्या गांजा विकणाऱ्या दोघा संशयितांना अटक केली. यासाठी सापळा रचण्यात आला. गांजा विकायला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली; आणि शिताफिने सातपूर पोलिसांनी गुन्हेगारांना गजाआड केले. सध्या त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलीय.
नाशिक शहरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याने या प्रकारच्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.