नाशिक -बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरातील ( Trimbakeshwar Temple ) भगवान शंकरांच्या पिंडीवर बर्फ जमा झाल्याची घटनासमोर आली आहे. भारत-चीन युद्धा नंतर 1962 मध्येही अशाच प्रकारे पिंडीवर बर्फ जमा झाल्याची नोंद मंदिराकडे होती. मात्र पिंडीवर बर्फाचा थर ही नैसर्गिक घटना असून चमत्कार नाहीच असे अंनिसकडून सांगण्यात आले आहे. भाविकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे अंनिसने आवाहन ( Annis appealed not to believe rumors ) केले आहे.
Nashik Trimbakeshwar Temple: मंदिरातील पिंडीवर बर्फ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे अंनिसने आवाहन - अफवांवर विश्वास ठेवू नये
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरातील ( Trimbakeshwar Temple ) शंकरांच्या पिंडीवर बर्फ जमा झाल्याची घटनासमोर आली आहे. मात्र पिंडीवर बर्फाचा थर ही नैसर्गिक घटनांमुळे जमा झाल्याचे अंनिसकडून सांगण्यात आले आहे. भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे अंनिसकडून आवाहन ( Annis appealed not to believe rumors ) करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर बर्फाचे थर -त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर बर्फाचे थर जमा झाल्याची बातमी सोशल मीडियातून झळकत आहे. मात्र पिंडीवर बर्फ जमा होणे ही पूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया आहे. वातावरणातील तापमानाची घट हे त्यामागील प्रमुख कारण आहे, असं अंनिसचे म्हणणे आहे. सामान्यपणे गाभार्यातील तापमान आणि बाहेरचे तापमान यामध्ये 12 ते 13 अंशापर्यंत तफावत असते. साहाजिकच गाभाऱ्यातील बाष्पयुक्त हवेला थंडावा मिळाल्याने आणि पिंडीचा भाग गुळगुळीत असल्याने तेथे बर्फाचे लहान लहान थर जमा होतात. रात्रीच्या वेळी तापमानात अधिक घट झालेली असते. त्यामुळे पहाटेच्या वेळी बर्फ तयार होण्याचे प्रमाण वाढते ( ice formation increases in morning ) . यात कोणताही दैवी चमत्कार किंवा चांगले-वाईट घडण्याचे दैवी संकेत नाहीत. भाविकांनी आणि सामान्य नागरिकांनी अशा नैसर्गिक घटनांना चमत्कार समजू नये. अफवा पसरविणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, असे अंनिसच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.