नाशिक - शहरालगत असलेल्या जाखोरी गावात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पतीने पत्नीच्या अंगावर आणि गळ्यावर धारदार कोयत्याने वार करून तिला ठार केले. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती शिवाजी माळी याला अटक केली आहे.
नाशिक शहराजवळील जाखोरी गावात पतीने केली पत्नीची हत्या... हेही वाचा...मुलीच्या प्रियकराचा आईनेच काढला काटा; इगतपुरी तालुक्यातील घटना
शिवाजी माळी आणि त्याची पत्नी मिना माळी यांच्यात वाद झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पती शिवाजी माळी हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणामुळे दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर झोपी गेलेल्या पत्नीच्या अंगावर शिवाजीने रात्री धारदार कोयत्याने वार करुन तिला गंभीर जखमी केले. तसेच त्याने शेजारी झोपलेल्या मुलीलाही जखमी केले.
पत्नी मिना माळी यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला. मुलीने शेजारी राहणाऱ्या रहिवाशांकडे धाव घेतली आणि मिना यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केले आहे.