नाशिक - केंद्र सरकार लागू करत असलेले तीन कृषी कायदे रद्द करावे म्हणून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी नाशिकहून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून शेकडो शेतकरी वाहनाने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. जोपर्यंत सरकार कृषी कायदे रद्द करत नाही, तोपर्यत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
नाशिकहून ओझर, पिंपळगाव, चांदवड, उमराने, मालेगाव आणि शहापूर येथे जनतेच्या वतीने या शेतकरी जथ्याचे स्वागत केलं जाणार आहे. या आंदोलनात शेकडो वाहनांतून शेतकरी 1 हजार 266 किलोमीटरचा प्रवास करून 24 डिसेंबरला दिल्ली बॉर्डरवर पोहचणार आहेत. या आंदोलनात किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ. डी. एल. कराड, सुनील मालुसरे, राजू दिसले आदी सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्रातून दिल्ली येथे निघालेल्या शेतकऱ्यांच्या लॉग मार्चला विविध शेतकरी संघटनेसोबत आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष, मुस्लीम संघर्ष समिती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदीने पाठिंबा दिला आहे. लाँग मार्च निघण्यापूर्वी उपस्थित सर्व पक्षाच्या आणि संघटनाच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केलं.
..तोपर्यंत आंदोलन राहणार सुरूच -
केंद्र सरकार कृषी कायदे रद्द करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे. यासाठी शेतकरी रेशन-पाणी, कपडे सोबत घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत.
शेतकरी उध्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा डाव -