महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना रुग्णांची संख्या 600 पार जाऊनही नाशिककरांची बाजारपेठेत मोठी गर्दी - corona news in nashik

नाशिकमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 635 वर पोहोचलेली असूनही नाशिककरांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

nashik people gathered in market
नाशिककरांची बाजारपेठेत मोठी गर्दी

By

Published : May 10, 2020, 3:09 PM IST

नाशिक- दिवसेंदिवस नाशिकसह मालेगाव शहरात रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. नाशिककरांना मात्र त्याचे गांभीर्य दिसून येत नाही. रविवार कारंजा परिसरात ज्यूस पिण्यासह किराणा मालाच्या खरेदी आणि इतर खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याचे चित्र दिसून आहे.

नाशिककरांची बाजारपेठेत मोठी गर्दी

लॉकडाऊनच्या काळात काही शिथिलता देत दुकाने सुरू झाली. मात्र, नागरिकांकडून त्याला हरताळ फासला जातोय. फिजिकल डिस्टनसिंगचा तर अक्षरशः फज्जा उडाला असून बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली.

नाशिक जिल्ह्याची कोरोनाची आकडेवारी

जिल्ह्यात नाशिक शहर 63 , नाशिक ग्रामीण 62, मालेगाव 515 , इतर जिल्ह्यातील 19 कोरोना रुग्ण आहेत. आत्तापर्यंत 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्याची कोरोना रुग्णांचा आकडा 635 वर जाऊन पोहचला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details