महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशकात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट, चार जण जखमी

नाशिकच्या खुटवडनगर परिसरात गॅस गळतीमुळे स्फोट झाला. या घटनेत कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. स्फोट एवढा भीषण होता की, घराची भिंत कोसळल्या. तर घरापासून 5 ते 10 फूट अंतरावर उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटल्या आहेत.

गॅस गळतीमुळे भीषण स्फोट
गॅस गळतीमुळे भीषण स्फोट

By

Published : Jan 4, 2021, 4:30 PM IST

नाशिक -सोमवारी सकाळी सातच्या सुमारास खुटवड परिसरात घरगुती गॅस सिलेंडर मधुन गॅस गळती होऊन स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की स्फोट होताच घरातील भिंती पडल्या. तर संपूर्ण खिडकीच्या काचा फुटल्या गेल्या. या स्फोटात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन या घरात राहणारे पगार कुटुंबियातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी

वाहनांच्या काचा फुटून मोठे नुकसान-

हा स्फोट एवढा भीषण होता की घराचे संपूर्ण नुकसान तर झाल आहे. तडे जाऊन घराची भिंत कोसळली आहे. तसेच घरापासून 5 ते 10 फूट अंतरावर उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. घरातील दरवाजा आणि खिडक्या बंद असल्याने गॅस गळतीमुळे गॅस सर्वत्र परसला आणि कोंडला गेला. त्यानंतर गॅस सुरु करताना किंवा इलेक्ट्रिकचे बटण चालू केल्याने हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. तर अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत.

लाईटर ऑन केल्याने झाला स्फोट-

सोमवारी सकाळी सातच्या सुमारास महिला दूध गरम करण्यासाठी गॅस जवळ गेली. गॅस चालू करत असताना लाईटर ऑन केले त्यानंतर स्फोट झाला आहे. हा स्फोट सिलेंडरचा नसून गॅस गळती होऊन स्फोट झाला असल्याचे अंंबड पोलीस टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यानी सांगितले आहे.

हेही वाचा-सरपंचपदाचे लिलाव निवडणूक आयोगाच्या रडारवर

ABOUT THE AUTHOR

...view details