नाशिकआज श्रावण Shravan 2022 महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार असल्याने नाशिक येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात Trimbakeshwar Mahadev Temple भाविकांनी मोठी गर्दी Huge crowd of devotees केली. राज्यभरातून भावीक या ठिकाणी दाखल झाले असून मंदिर परिसरात पहाटे पासून भाविकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. श्रावण सोमवार निमित्त मंदिरात महापूजा अभिषेक आरती आणि अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
ब्रह्मगिरी प्रदक्षिणा महत्त्वत्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली जाते. मात्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी ही प्रदक्षिणा केल्यास अधिक फलप्राप्ती होते. असे म्हणटले जाते म्हणून जिल्ह्याभारतातून लाखो भाविक या दिवशी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होतात. बहुतांश भाविक रविवारी रात्री बारा वाजे नंतर कुशावर्त कुंडावर स्नान करून त्र्यंबक राजाचे दर्शन करून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस सुरुवात करतात. 20 किलोमीटरच्या फेरी दरम्यान अनेक तीर्थ दिसतात. त्यातील बहुतेक तीर्थ आजकालच्या ओघात लुप्त झालेत. प्रदक्षिणेचा मार्ग देखील सोयीचा ठरेल असा त्यात बदल झाला आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा फेरी करतांना भगवान भोलेनाथाचे नामस्मरण करत भाविक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. या प्रदक्षिणा मार्गावर सरस्वती तीर्थ रामतीर्थ नागातीर्थ निर्मल तीर्थ व प्रयाग तीर्थ आदी मंदिरे मंदिरे आहेत. जेथे भाविक नतमस्तक होतात. तसेच डोंगर दऱ्या व निसर्गरम्य वातावरण मन प्रसन्न करते आणि भाविक या ठिकाणी सहकुटुंब ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यंदा एसटी महामंडळाच्या वतीने त्रंबकेश्वर साठी 300 ज्यादा बसेस ची व्यवस्था केली आहे. तसेच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय.