नाशिक -लॉकडाऊन काळात महिलांचे प्रोफाईल बनवून हनी ट्रॅपच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. सोशल मीडियाचा वापर करतांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केलं आहे.
माहिती देताना नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील नाशिकमध्ये लॉकडाऊन काळात गेल्या वर्षभरापासून हनी ट्रॅपच्या घटनां वाढल्या आहेत. महिलांचे प्रोफईल बनवून हनी ट्रॅपमध्ये लोकांना अडकवण्याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. ऑनलाइन फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेत सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक पोलिसांनी याबाबत जनजागृतीसाठी एक मोहीम हाती घेतली असून, त्याद्वारे लोकांनी काळजी व फसवणूक झाली असेल, तर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीची ओळख व नाव गोपनीय ठेवले जाईल. त्यामुळे न घाबरता तक्रार केल्यास यामागे असलेले मोठे रॅकेट उघड होऊन इतर लोकांची फसवणूक टाळता येऊ शकते, असे पोलिसांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -शासकीय इमारतीवर भगवा लावणे म्हणजे संविधानाला खीळ बसवणे - अॅड. गुणरत्न सदावर्ते
काय आहे हनी ट्रॅप -
सर्वांनी सोशल मीडियाचा अभ्यास करून ते वापरणे व सतर्क राहणे गरजेचे आहे. फेसबुक, व्हॉट्सअँप, इन्स्टाग्राम या माध्यमातून महिलांच्या नावाने बनावट अकाउंट तयार केले जाते, यानंतर पुरुषांशी मैत्री झाल्यावर अश्लील चाळे करण्यास भाग पाडून त्याचा व्हिडिओ तयार करण्यात येतो व शेवटी अकाउंट हॅक करून धमकीद्वारे पैशाची मागणी केली जाते. त्यामुळे शारीरिक लोभाचे आमिष दाखवून अनोळखी महिलेशी बोलताना सतर्कता ठेवा. नाशिक पोलिसांनी यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पीडित व्यक्तींनी समोर यावे, असं आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनीं केले आहे.
मला अश्लील चाळे करण्यास भाग पाडलं-
मला फेसबुकहून एका सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. मी ती स्वीकारली, नंतर मला फेसबुक मेसेंजरवरून त्या मुलीचे मॅसेज येऊ लागले, मी पण काही वेळ तिच्याशी बोललो, नंतर तिने मला माझा व्हॉटसअॅप नंबर मागितला. मला वाटलं चांगली मैत्री होईल म्हणून मी देखील नंबर दिला. त्यानंतर तिने माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. मी त्यालाही प्रतिसाद दिला, तिने सांगितलं मी दिल्ली येथे राहते. त्याच दिवशी मला रात्री तिचा व्हिडिओ कॉल आला. त्यात तिने मला शरीर लोभाचे आमिष दिले आणि मी पण तिच्या बोलण्यात अडकून गेलो. तिने मला अश्लील चाळे करण्यास भाग पाडले, आणि त्याचा व्हिडिओ तयार करुन काहीवेळाने तोच मला पाठवला आणि माझ्याकडे 25 हजारांची मागणी केली. पैसे दिले नाही तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. मी ही गोष्ट माझ्या मित्राला सांगितल्यानंतर त्याने मला सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर मी तक्रार दाखल केली, असे एका तक्रारदाराने सागितलं आहे.
हेही वाचा -जालन्यातील 'त्या' मांत्रिकाला अटक; पैशाचा पाऊस पाडण्यासाठी कुटुंबातील सदस्याचा बळी मागितला होता