नाशिक - पेट्रोलचा भाव 90 रुपये झाला असून डिझेलचे दर देखील वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारतात पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईने वेग पकडला आहे. सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. नाशिकमध्ये पेट्रोलचे भाव 90 रुपये 20 पैसे, तर स्पीड पेट्रोलचे भाव 93 रुपये 61 पैसे लिटर वर जाऊन पोहोचले आहेत. तर डिझेलचे भाव देखील 79 रुपये 14 पैसे झाले आहेत. सतत होणाऱ्या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने पेट्रोलच्या भावावर अंकूश ठेऊन दर नियंत्रणात आणावे, अशा प्रतिक्रिया वाहनधारकांनी दिल्या.
कोरोना काळात स्वतःचे वाहन चालवण्यास प्राधान्य