नाशिक -आज(28 सप्टेंबर) सकाळपासून नाशकात पावसाची संततधार सुरू आहे, गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून गोदावरी नदीत 3 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून, नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यांत आला आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरामधील गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्या अनुषंगाने आज सकाळपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा -मुलींची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही चुकीचं केलं नाही, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार - अनिल परब
- नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 966 मिलीमीटर पाऊस -