नाशिक - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. त्यानंतर आता वरिष्ठ महाविद्यालय उद्या म्हणजेच २० तारखेपासून सुरू होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबत निर्णय घेतला आहे. कोरोनाचे नियम पाळून महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. 50 टक्के शमते सह सुरुवातीला ऑफलाइन शिक्षण उद्यापासून सुरू होणार आहे. तर उद्या महाविद्यालय सुरू होत आहे, हा निर्णय योग्य असून महाविद्यालयीन तरुणांचा लसीकरण हे मोठे आव्हान आहे. राज्यात आतापर्यंत 70 टक्के पहिला लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. तर 35 टक्के दुसरा डोसचे लसीकरण झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते नाशकात बोलत होते.
'कॉलेज स्तरावर विद्यार्थ्यांना लसीकरणाच महत्त्व पटवून दिले जाणार'