नाशिक - द्वारका पीठाधीश्वर शंकराचार्य हे काँग्रेसचे असल्याचे महंत सुधीर पुजारी यांनी म्हटले त्यावरून गोविंद दास संतापले. यानंतर सुधीर पुजारी यांनी माफी मागावी असे गोविंददास यांनी म्हटले यावरून वाद पेटला. यादरम्यान सुधीर पुजारी यांनी माईक गोविंददास यांच्यावर उगारला त्यानंतर पोलिस बंदोबस्त मध्ये गोविंददास यांना एका खोलीमध्ये बंद करण्यात आले. माफी मागितल्याशिवाय नाशिक सोडणार नाही असे गोविंददास यांनी म्हटलेय.
खुर्चीवर बसण्यावरून झाला वाद - नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळावरून वाद सुरू आहे. हा वाद सोडविण्यासाठी महंत अनिकेत देशपांडे यांनी नाशिकरोड येथील त्यांच्या पिठात शास्त्रार्थ सभेचे आयोजन केले ( Shastrartha Sabha in nashik ) होते. मात्र सभेच्या सुरवातीला गोविंदानंद महाराज आणि नाशिकच्या साधू महांतमध्ये वाद झाला. गोविंदानंद महाराज यांनी खुर्चीवर नं बसता आमच्यासोबत खाली बसून चर्चा करावी अशी मागणी केली. यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. अखेर गोविंदानंद महाराज यांनी माघार घेत खाली बसून चर्चा केल्याचे मान्य केल्या नंतर शास्त्रार्थ सभेला सुरुवात झाली.
अंजनेरीचे ग्रामस्थ आक्रमक - हनुमंतांचे जन्मस्थान अंजनेरी की किष्किंधा हा वाद पेटला असून गोविंदानंद महाराजांविरोधात अंजनेरीतील गावकरी आक्रमक झाले होते. गोविंदानंद महाराज यांनी अंजनेरी किल्ल्यावर येण्याचे आव्हान ग्रामस्थांनी दिले होते. गोविंदानंद महाराज यांनी कर्नाटकातिल किष्किंधा पर्वत हनुमंताचे स्थान असल्याचा दावा केला असून त्यासाठी पुराव्यानिशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अंजनेरी गाम्रस्थ आक्रमक झाले होते. अंजनेरीतील अंजनी माता मंदिरात गावकरी आणि साधूसंतांची बैठक झाली. अंजनेरी हेच जन्मस्थळ असून वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई देखील लढवण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.