महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Hanuman Birth Place Controversy : हनुमान जन्मस्थळ वादावरून नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभा, गोविंदानंद महाराज खुर्चीवर बसल्याने वाद - Shastrartha Sabha in nashik

नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळावरून वाद सुरू ( Hanuman Birth Place Controversy ) आहे. हा वाद सोडविण्यासाठी महंत अनिकेत देशपांडे यांनी नाशिकरोड येथील त्यांच्या पिठात शास्त्रार्थ सभेचे आयोजन केले ( Shastrartha Sabha in nashik ) होते. मात्र सभेच्या सुरवातीला गोविंदानंद महाराज आणि नाशिकच्या साधू महांतमध्ये वाद झाला. गोविंदानंद महाराज यांनी खुर्चीवर नं बसता आमच्यासोबत खाली बसून चर्चा करावी अशी मागणी केली. यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.

Hanuman Birth Place Controversy
गोविंदानंद महाराज हे खुर्चीवर बसल्याने वाद

By

Published : May 31, 2022, 1:53 PM IST

Updated : May 31, 2022, 2:32 PM IST

नाशिक - नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळावरून वाद सुरू आहे. हा वाद सोडविण्यासाठी महंत अनिकेत देशपांडे यांनी नाशिकरोड येथील त्यांच्या पिठात शास्त्रार्थ सभेचे आयोजन केले ( Shastrartha Sabha in nashik ) होते. मात्र सभेच्या सुरवातीला गोविंदानंद महाराज आणि नाशिकच्या साधू महांतमध्ये वाद झाला. गोविंदानंद महाराज यांनी खुर्चीवर नं बसता आमच्यासोबत खाली बसून चर्चा करावी अशी मागणी केली. यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. अखेर गोविंदानंद महाराज यांनी माघार घेत खाली बसून चर्चा केल्याचे मान्य केल्या नंतर शास्त्रार्थ सभेला सुरुवात झाली. या ठिकाणाहून आढावा घेतला ईटीव्ही भारताच्या प्रतिनिधीने.

गोविंदानंद महाराज खुर्चीवर बसल्याने वाद

अंजनेरीचे ग्रामस्थ आक्रमक - हनुमंतांचे जन्मस्थान अंजनेरी की किष्किंधा हा वाद पेटला असून गोविंदानंद महाराजांविरोधात अंजनेरीतील गावकरी आक्रमक झाले होते. गोविंदानंद महाराज यांनी अंजनेरी किल्ल्यावर येण्याचे आव्हान ग्रामस्थांनी दिले होते. गोविंदानंद महाराज यांनी कर्नाटकातिल किष्किंधा पर्वत हनुमंताचे स्थान असल्याचा दावा केला असून त्यासाठी पुराव्यानिशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अंजनेरी गाम्रस्थ आक्रमक झाले होते. अंजनेरीतील अंजनी माता मंदिरात गावकरी आणि साधूसंतांची बैठक झाली. अंजनेरी हेच जन्मस्थळ असून वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई देखील लढवण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.


काय आहे प्रकरण -नाशिकमधील अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. महंत गोविंदानंद त्र्यंबकेश्वर येथे हनुमानाच्या जन्मस्थानावरील वैज्ञानिक पुरावे आणि दाव्यांवर चर्चा करण्यासाठी आले आहेत. त्यांनी धर्मग्रंथ, वेद आणि पुराणांच्या संदर्भात दाखले देऊन जन्मभूमीच्या दाव्यावर पुढे येऊन चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी केले. महंत गोविंदानंद स्वामी यांनी एकप्रकारे नाशिकच्या संत महंतांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. किष्किंधा मठाधिपतीने हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी नसून किष्किंधा असल्याचा दावा केला आहे.

गोविंदानंद महाराज खुर्चीवर बसल्याने वाद

'या' ठिकाणी जन्म झाल्याचा दावा -नाशिकमधील महंत आणि साधू यांचे मात्र त्यांच्या जन्मस्थानापेक्षा वेगळे मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी शृंगेरी, द्वारका येथील शंकराचार्य आणि रामजन्मभूमी ट्रस्टच्या उपासकांचीही भेट घेतली आणि 20-20 दिवस या विषयावर चर्चा केली. त्यांची संमती मिळाली, गुजरातमधील डांग जिल्ह्यातील डोंगर, नाशिकमधील अंजनेरी, कर्नाटकातील किष्किंधा किंवा हरियाणातील काही ठिकाणी हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला जात होता. आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या हनुमान जन्मभूमीचे प्रकरण थेट न्यायालयात गेले असताना, न्यायालयाच्या आदेशानुसार तिरुपती देवस्थानने एक पाऊल मागे घेतले आहे.

हेही वाचा - Hanuman Birth Place Controversy : किष्किंधा पीठाचे महंत गोविंदानंद यांना पोलीसांकडून नोटीस

हेही वाचा - Padma Awards 2023: पद्म पुरस्कार-2023 साठी नामांकनाची अंतिम मुदत 15 सप्टेंबर

हेही वाचा -Abdul Sattar on Supriya Sule : मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीकडे सुप्रिया असतील तर आमच्याकडे रश्मी ठाकरे - राज्यमंत्री अब्दुल सत्तार

Last Updated : May 31, 2022, 2:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details