नाशिक -हनुमानाचा जन्म ( Hanuman birth place claim nashik ) किष्किंधा मधेच झाला, असा दावा किष्किंधाचे मठाधिपती गोविंदानंद ( Hanuman born in Kishkindha claims Mahant Govindanand ) यांनी केला आहे. हनुमान जन्मस्थळावर ( Hanuman birth place Anjaneri ) कोणाशीही, कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचा दावा गोविंदानंद ( Mahant Govindanand nashik ) यांनी केला. या चर्चेसाठी गोविंदानंद त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले असून त्यांनी नाशिकच्या महंत, पुरोहित, पुजारी, अभ्यासक यांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा पुरावा द्यावा, असे आव्हान केले आहे.
माहिती देताना महंत अनिकेत देशपांडे हेही वाचा -Nashik Water Crisis : गावात पाण्याची तीव्र टंचाई, मुलांना लग्नासाठी देत नाहीत मुली, पाहा खास रिपोर्ट
हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला, असे इथल्या लोकांचे मत आहे. अंजनेरी हे नाव हनुमानाची आई अंजनीमातेच्या नावावरून पडले. इथे डोंगरावर अंजनी मातेचे आणि हनुमानाचे मंदिरही आहे. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या लोकांचे हे श्रद्धास्थान आहे. पुराणात 14 वर्षे वनवास काळात राम-सीता-लक्ष्मण नाशिकमधल्या पंचवटी भागात राहात होते असा उल्लेख आहे. तर, हनुमानाचा जन्म इथल्या अंजनेरी डोंगरावर झाला आहे, असा दावा नाशिकमधील लोकांचा आहे.
मात्र, आता हनुमानाच्या जन्मस्थळावरून महंत आणि साधूंमध्येच मतमतांतर पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी हनुमानाच्या जन्मस्थानावरून आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये वाद समोर आला होता. हनुमानाचा जन्म अंजनाद्री पर्वतात झाला, असा दावा तिरुमला तिरुपती देवस्थानने केला होता. मात्र हनुमानाचे जन्मस्थान नाशिकचे अंजनेरी नव्हे किष्किंधा असल्याचा दावा किष्किंधाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केला आहे. त्यासाठी ते त्र्यंबकेश्वरात दाखल झाले आहेत. तर, नाशिकमधील काही साधू, महंतांनी या दाव्यावर आक्षेप घेतला.
अंजनेरी महात्म्य -नाशिकमधील त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत वसलेला 4 हजार 200 फूट उंचीचा अंजनेरी गड अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून परिचित आहे. नाशिक येथून अंजनेरी गडापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनेरी गावात पोहचल्यावर गडाची वाट धरता येते. गडाच्या निम्म्यापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनाने सहज जाणे शक्य आहे. दीड किलोमीटरची गडाची वाट वाहनाने पूर्ण करता येते. नाशिक वनविभागाच्या अखत्यारितीत असलेला अंजनेरी गड हा संपूर्णपणे राखीव वन संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. अंजनेरी गड चढाईच्या दृष्टीने सोपा आहे. अंजनेरी गडावर पोहचल्यानंतर परिसरातील विहंगम नैसर्गिक दृश्य डोळ्यांची पारणे फेडतो. अंजनेरी गावात गडाच्या प्रारंभी बाल हनुमान व अंजनी मातेचे मंदिर आहे.
हेही वाचा -Sakshi Maharaj on Raj Thackeray : ..तर राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी - भाजप खासदार साक्षी महाराज