नाशिक - शरद पवारांना जातीयवादी ठरवण्यासाठीच काल राज ठाकरेंची सभा होती की काय? असा प्रश्न उपस्थित करत तुम्ही सभेत फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना या केला ( Chhagan Bhujbal On Raj Thackeray ) आहे. नाशिकला एका कार्यक्रमादरम्यान भुजबळ पत्रकारांशी बोलत होते.
टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, हे धादांत खोटं -रायगडावर जेव्हा महात्मा फुलेंनी समाधी शोधली, त्यावेळी टिळक केवळ 13 वर्षांचे होते, टिळक दोन वेळा रायगडावर गेले मात्र त्यांना शिवाजी महाराजांची समाधी मिळाली नाही, टिळकांनी एकदा नानासाहेब पेशवे आणि दुसऱ्यांदा रामदास स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. टिळकांनी शिवस्मारकासाठी केवळ फंड गोळा केला. मात्र उभ्या आयुष्यात काहीच केले नाही. पुढे टिळक यांना याबाबत विचारणा झाल्यावर ज्या बँकेत फंड ठेवला होता, ती बँकच बुडाली असे सांगण्यात आल्याचे भुजबळ यांनी म्हटले.