महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अडीनडीला कामाला येतंय ते सोनं.. कोरोना संकट काळात अनेकांना सोन्याचा आधार

कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना आधी सोन्यात केलेल्या गुंतवणुकीचा आधार मिळत आहे. अनेक नागरिक आपल्या दैनंदिन गरजा कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सोनं मोडत आहेत किंवा सोने गहाण ठेऊन आपल्या गरजा भागवत आहेत.

nasik gold story
nasik gold story

By

Published : Jun 22, 2021, 7:18 PM IST

नाशिक - कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना आधी सोन्यात केलेल्या गुंतवणुकीचा आधार मिळत आहे. अनेक नागरिक आपल्या दैनंदिन गरजा कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सोनं मोडत आहेत किंवा सोने गहाण ठेऊन आपल्या गरजा भागवत आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून देशाला मोठा आर्थिक फटका बसला असून याकाळात आर्थिक उलाढाल जवळपास ठप्प झाल्याने अनेकांचे व्यवसाय बंद पडले तर अनेकांच्या नोकऱ्या हिरवल्या गेल्या आहेत.

मात्र अशा अडचणीच्या काळात नागरिकांनी आधी केलेली सोन्यातील गुंतवणूक त्यांना मदतीस येत आहे. यामुळे अनेक नागरिक आपली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी घरातील दागिने गहाण ठेवत आहेत. तर काही जण मोड करून आपल्या गरजा भागवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोन्याची गुंतवणूक उत्तम गुंतवणूक असा प्रत्यय नागरिकांना येतोय.

कोरोना संकट काळात अनेकांना सोन्याचा आधार
रुग्णांवर उपचारासाठी झाली मदत -


सोन्यात गुंतवणुकीमागील महत्त्वाचे कारण म्हणजे ते उत्तम परतावा तर देतेच मात्र अर्ध्यारात्री सराफाकडे जाऊन मोड करून रोख रक्कम मिळवता येते. अडचणीच्या काळात ही मदत महत्वाची ठरत आहे. याचा प्रत्यय रुग्णांच्या नातेवाईकांना आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारावेळी अनेक नातेवाईकांनी सोन्याचा पर्याय निवडला, काहींनी सोने विकून तर काहींनी सोने गहाण ठेऊन आर्थिक अडचण भागवली. यासोबतच काहींनी घराचे हप्ते, गाडीचे हप्ते, घरभाडे भरण्यासाठी सुद्धा सोन्याची मोड केली.

अडचणीत सोने आले कामी -

कोरोना काळात नागरिकांना सोने कामी आले. आजही अशीच परिस्थिती असून अनेक नागरिक रोज सोने विकून गहाण ठेऊन खर्च भागवत आहेत. त्यामुळेच जेवढे ग्राहक सोने खरेदीसाठी येत आहेत, तेवढेच ग्राहक सोन्याची मोड करण्यासाठी दुकानात येत असल्याचे सराफा व्यवसायिक मयूर शहाणे यांनी सांगितले

लग्नकार्यात सोन्याला आली झळाळी -

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी अजून नाशिकमध्ये जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण निर्बंध उठवण्यात आले नसून लग्न समारंभासाठी केवळ 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लग्न समारंभाला लागणारा लाखो रुपयांच्या पैशाची बचत होत आहे. बचत होणाऱ्या पैशांमधून आई-वडील, नवरी मुली, मुलाला आधीच सोने खरेदी करत असून घरातील इतर सदस्य देखील सोन्याची हौस भागवत असल्याने सोने खरेदीमध्ये वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details