महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Godavari River Polluted Nashik : नाशिकमधील गोदावरीचे पाणी आंघोळीसाठी अपायकारक, हरित लवादाने महापालिकेला सुनावले - राष्ट्रीय हरित लवाद

तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकला जात गोदावरीत डुबकी मारणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे. गोदावरीचे पाणी पिण्यासाठी तर सोडाच, अंघोळीसाठीही अपायकारक ( Godavari Water Harmful For Bathing ) असल्याचे हरित लवादाने ( National Green Tribunal ) म्हटले आहे.

नाशिकमधील गोदावरीचे पाणी आंघोळीसाठी अपायकारक, लवादाने महापालिकेला सुनावले
नाशिकमधील गोदावरीचे पाणी आंघोळीसाठी अपायकारक, लवादाने महापालिकेला सुनावले

By

Published : Feb 17, 2022, 7:48 PM IST

नाशिक : नाशिकच्या गोदावरी नदीत प्रक्रियानं केलेले पाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे हे पाणी तीर्थ म्हणून पिण्यासाठी सोडा, मात्र आंघोळीसाठी देखील अपायकारक ( Godavari Water Harmful For Bathing ) असल्याचे म्हणत राष्ट्रीय हरित लवादाने ( National Green Tribunal ) महानगरपालिकेला ( Nashik Municipal Corporation ) सुनावले आहे.

नाशिकमधील गोदावरीचे पाणी आंघोळीसाठी अपायकारक, हरित लवादाने महापालिकेला सुनावले

सांडपाणी सोडणे रोखण्यास अपयश

देशभरातुन येणाऱ्या भाविकांचे श्रद्धा स्थान असलेली गोदावरी नदी प्रदूषित झाली आहे. गोदावरी नदीत स्नान केल्यास पापांचा नाश होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र हे पाणी आता स्नान करण्यालायक नसल्याचा धक्कादायक निर्णय हरित लवादने दिल्यामुळे नाशिक महापालिकेला मोठा धक्का बसला आहे. त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीला जाऊन मिळणाऱ्या जलस्रोतामध्ये पालिकेचे सांडपाणी सोडणे रोखण्यास अपयश आल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने सुनावले आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीत सोडले जात असल्याचे लवादाने म्हटले आहे.

पिण्यासाठी तर सोडाच

दर बारा वर्षांनी नाशिकच्या रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्या रामकुंडातील पाणी पिण्यासाठी तर सोडाच, मात्र साधं स्नान करण्यासाठी देखील योग्य नसल्याचा निर्वाळा हरित लवाद न दिला आहे. हरित लवादच्या या निर्णयामुळे महापालिकेला मोठा धक्का बसला आहे. लाखो भाविक ज्या पाण्याला तीर्थ म्हणून प्राशन करतात, ज्या पाण्यात श्रद्धेने स्नान करतात, ते पाणी आता योग्य नसल्याचा निर्णय हरित लवाद ने दिल्याने लाखो भाविकांच्या श्रद्धेला देखील मोठी ठेच पोहचली आहे.

लाखो लिटर दूषित पाणी नदीत सोडले जाते

राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल आणि न्या. सुधीर अग्रवाल यांच्या खंडपीठाने म्हटले आहे, की दर दिवशी शहरात 45 ते 50 लाख लिटर सांडपाणी तयार होते.मात्र केवळ 10 लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे उर्वरित 35 ते 40 लाख लिटर सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीमध्ये सोडले जाते. या सांडपाण्यामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असून, ते पाण्याच्या गुणवत्तेच्या प्राथमिक निकषांनुसार अंघोळीसाठीही योग्य नाही. मात्र, मनुष्य आणि अन्य प्राणी हे पाणी पित असून, त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे लवादाने म्हटले आहे.

200 कोटींचा प्रस्ताव

हरित लवादाचा रिपोर्ट माझ्या पाहण्यात आला नाही. मात्र ही वस्तुस्थिती आहे की गोदावरी नदीत 100 शुद्ध पाणी नाही. जुने काही एसटीपी प्लांट आहे जे अद्यावत करणे गरजेचे आहे. यासाठी चार जुने एसटीपी अद्यावत करण्यासाठी 200 कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे. तसेच नमामी गोदा या कार्यक्रमातुन आम्ही 2050 ची लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणारे नदी प्रदूषण घेता घेता त्या पद्धतीचे नियोजन करत आहोत. तसेच शहरातील 67 नाले, 4 उप नद्या तसेच कुठल्याही ड्रेनेजमधून अशुद्ध पाणी नदीत मिसळणार नाही, याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details