नाशिक - शहर आणि परिसरात आज रविवार (दि. 7 ऑगस्ट)रोजी पावसाचा जोर कमी असला तरी पंचवटी परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातून येणारी गोदावरीची उपनदी वरुणा (वाघाडी) पूर आला. पुराचे पाणी गाडगे महाराज पुलाखाली वेगाने आले. यामुळे नदीपात्रात उभ्या असलेल्या काही वाहनांपैकी एक रिक्षा एक कार, पाण्यात वाहून गेली.
गोदा काठावरील दुकानांना आणि वाहनांना अचानक आलेल्या पुराने घातला वेढा -नाशिक शहरात अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने गोदावरीला पूर आला आहे. गोदा काठावरील दुकानांना आणि वाहनांना अचानक आलेल्या पुराने वेढा घातला आहे. नागरिकांनी आणि स्थानिक जीवरक्षक दलांनी पाण्यात प्रवेश करून पाण्यात वाहून जाणारी एक रिक्षा बाहेर काढली. मात्र, एक रिक्षा आणि कार गाडगे महाराज पुलाखाली गोदावरी नदीपात्रात बुडाली आहे. तसेच, येथील नारोशंकर मंदिराच्या शेजारी नदीपात्रात असलेल्या गोपालदास समाधी मंदिराला लागून एक रिक्षा पाण्यात अडकून पडली आहे.