महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या - मंत्री छगन भुजबळ

मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, ही सर्व पक्षीय भुमिका असून माझी व माझ्या पक्षाची देखील हीच भुमिका आहे. त्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत असून, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

maratha muk morcha Chhagan Bhujbal
समाज वितृष्ट छगन भुजबळ

By

Published : Jun 21, 2021, 3:06 PM IST

नाशिक -मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा आणि माझ्या पक्षाचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, ही सर्व पक्षीय भुमिका असून माझी व माझ्या पक्षाची देखील हीच भुमिका आहे. त्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत असून, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

हेही वाचा -जागतिक योग दिन : गिर्यारोहकांनी केले अंकाई किल्ल्यावर योगासन व वृक्षारोपण

नाशिक शहरातील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारील मैदानावर छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या मुक आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या निमंत्रणावरून पालकमंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहिले. भुजबळ यांनी सदर भुमिका स्पष्ट करत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला.

ओबीसी आणि मराठा समाजात द्वेश पसरवण्याचे काम करू नये

आज मराठा आणि ओबीसी दोन्हीही समाज अडचणीत आहे. काही लोकं जाणीवपूर्वक मराठा समाज व ओबीसी समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आमची दैवते ही एकच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू, फुले, आंबेडकर ही आमची दैवत आहेत, त्यामुळे कोणीही आमच्यात द्वेष पसरवण्याचे काम करू नये, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

हा व्यवस्थे विरुद्ध लढा

मराठा समाजाच्या आरक्षणासह ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही अतिशय महत्वाची असल्याचे मत देखील भुजबळ यांनी व्यक्त केले. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकारात्मक आहे. ज्या ज्या वेळेस विधिमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित झाले, त्या त्या वेळेस आम्ही पाठिंबाच दिला आहे. आज आरक्षणाचा प्रश्न हा दोन समाजातील नसून हा व्यवस्थेविरुद्ध लढा आहे, आणि त्याला माझा नेहमीच पाठिंबा असेल, असे मत देखील भुजबळ यांनी व्यक्त केले.

आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी सर्वांना एकत्रित करण्याची जी भुमिका घेतली आहे, ती स्वागतार्ह आहे. सर्वांना एकत्रित करताना संभाजीराजे हे अतिशय सामंजस्याची भुमिका घेत असल्याने त्यांचे कौतुक देखील मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला छत्रपती संभाजीराजे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -मिरची उत्पादक शेतकऱ्याला 15 लाखांचा गंडा, आरोपींना नाशिकमधून अटक

ABOUT THE AUTHOR

...view details