नाशिक - सकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पारंपरिक थाटात लाडक्या बाप्पाची स्थापना होत आहे. नाशिकच्या गंगापूर रोड, द्वारका, सिडको, सातपूर, नाशिक रोड, गोल्फ क्लब आदी ठिकाणी भाविकांची लाडक्या गणरायाला घेऊन जाण्यासाठी गणेशमूर्ती विक्रेत्यांकडे सकाळपासूनच गर्दी केली.
नाशिकामध्ये ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन - nashik ganpati news
नाशिकच्या गंगापूर रोड, द्वारका, सिडको, सातपूर, नाशिक रोड ,गोल्फ क्लब आदी ठिकाणी भाविकांची लाडक्या गणरायाला घेऊन जाण्यासाठी गणेशमूर्ती विक्रेत्यांकडे सकाळपासूनच गर्दी केली.
नाशिकमधील गणरायाचे आगमन
नागरिक सहपरिवारासह बाप्पाला घरी आणण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. गंगापूर रोड येथील सार्वजनिक मंडळ येथे प्रसिद्ध शिवताल ढोल पथकाने वादन करून लाडक्या गणरायाचे जोरदार स्वागत केले. या पथकात लहान मोठया वयोगटातील वादक सहभागी झाले होते.