नाशिक -देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. 22 मार्चपासून तब्बल 14 वेळा पेट्रोल व डिझेलच्या ( Diesel ) दरात वाढ झाली. यापाठोपाठ सीएनजीच्या ( CNG ) दरात चार रुपयांनी वाढ झाली असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे.
मागील महिनाभरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचेही दर वाढले आहेत. यात पेट्रोल ( Petrol ) 10 रुपये 45 पैसे तर डिझेल 10 रुपये 35 रुपये प्रति लिटर महागले आहे. तसेच सीएनजीच्या दरात 4 रुपये 4 पैसे रुपयांनी वाढ झाली असून सीएनजी ( CNG ) 67.9 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर तेल कंपन्यांनी या राज्यांमधील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढ ( Fuel Rate Hike in Nashik ) केली आहे.
रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागला -पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे दर वाढल्याने आता थेट परिणाम प्रवासी भाडेवाढीवर झाला आहे. वारंवार इंधन वाढ होत असल्याने रिक्षा, टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून अधिक भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याची झळ बसत आहे.