महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशकात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत 17 हजार नागरिकांचे मृत्यू ग्राह्य धरून अंत्यसंस्कारासाठी 3 कोटी 29 लाखांची निविदा - मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी टेंडर

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत शहरात 17 हजार नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो. अशी माहिती ग्राह धरून उपाययोजना म्हणून महानगरपालिकेने पावले उचलली असून त्यासंदर्भात त्यांनी टेंडर देखील केले आहे. कोरोना काळात मृत्यू पावलेल्या नागरिकांवर मोफत अंत्यसंस्कारासाठी पालिकेने विशेष योजनेचेही आयोजन केले आहे. यासाठी पालिकेने तब्बल 3 कोटी 29 लाख रुपयांचा टेंडर काढले आहे.

free funeral in nashik
मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी टेंडर

By

Published : Jan 14, 2022, 7:44 PM IST

नाशिक - नाशिक महापालिका हद्दीतमयत झालेल्या लोकांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याचे काम मनपा प्रशासनाकडून केला जाते. यासाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. स्मशानभूमी आणि आरामधाम यांनी निगा राखण्यापासून सर्व गोष्टीवर हा निधी खर्च केला जातो. यासंदर्भात मनपा प्रशासनाने दिलेले टेंडर संपणार आहे. त्यामुळे नाशिक मनपाने मोफत अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल 3 कोटी 29 लाख रुपयांचा टेंडर काढले आहे अशी माहिती पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन अधिकारी आवेश पलोड यांनी दिली आहे.

घनकचरा व्यवस्थापन अधिकारी आवेश पलोड यांची प्रतिक्रिया

तब्बल 3 कोटी 29 लाख रुपयांचा टेंडर -

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत शहरात 17 हजार नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो अशी माहिती ग्राह धरून उपाययोजना म्हणून महानगरपालिकेने पावले उचलली असून त्यासंदर्भात त्यांनी टेंडर देखील केले आहे. कोरोना काळात मृत्यू पावलेल्या नागरिकांवर मोफत अंत्यसंस्कारासाठी पालिकेने विशेष योजनेचेही आयोजन केले आहे. यासाठी पालिकेने तब्बल 3 कोटी 29 लाख रुपयांचा टेंडर काढले आहे.

17 हजार लोकांचे मृत्यू कसे होतील?

मागच्या काही वर्षांपासून मयत झालेल्या लोकांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याचे काम मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. याच धर्तीवर या तिसर्‍या लाटेत 17 हजार नागरिकांचा मृत्यू होईल असा अंदाज बांधत मयत होणाऱ्या या लोकांवर मोफत अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल 3 कोटी 29 लाख रुपयांचा टेंडर देण्यात आले आहे. मागच्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या कोरोना महामारी काळात चार हजार लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे असताना या तिसर्‍या लाटेत 17 हजार लोकांचे मृत्यू कसे होतील असे आरोप करत या टेंडरची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केला जातोय. दुसरीकडे हा प्रस्ताव तीन वर्षासाठी असून मागच्या वर्षी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने त्या वेळेस अंत्यसंस्कार करण्यासाठी निधी कमी पडला होता त्यामुळे पूर्वतयारी म्हणून हा टेंडर देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा -Wardha Illegal Abortion Case : कदम रुग्णालयाच्या परिसरात पुन्हा खोदकाम सुरू; नवीन खुलासे होण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details