नाशिक- शहरातील झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल असलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा तरुण पुण्याहून नाशिकला आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तरुणाच्या कोरोना तपासणी अहवालातून ही माहिती समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कॅम्पमधील चारशे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नाशिकला हादरा; पुण्यातून शहरात आलेल्या तरुणाला कोरोनाची लागण, 400 नागरिकांचे आरोग्य धोक्यात
झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल असलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या 24 वर्षे तरुणाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 46 वर गेला आहे.
शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहात उभारण्यात आलेल्या कॅम्पमध्ये हा युवक वास्तव्यास असल्याची माहिती आहे. सदर तरुण पुण्याहून नाशिकला आला होता. दरम्यान या तरुणाला कोरोनासदृश्य लक्षण दिसल्याने त्याला नाशिकच्या जाकीर हुसेन रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाची लागण झालेला हा तरुण परराज्यातून आणि दुसऱ्या शहरातून आलेल्या नागरिकांच्या कॅम्पमधील आहे. त्यामुळे आता या कॅम्पमधील वास्तव्यास असलेल्या चारशेहून अधिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या अहवालामुळे गंभीर बनला आहे.
संचारबंदी काळातही बाहेरील लोक शहरात येत असल्याने शहराला कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. नाशिकमधील या 24 वर्षे तरुणाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 46वर गेला. या घटनेनंतर नाशिकमध्ये परराज्यातील नागरिकांसाठी समाजकल्याण कार्यालयात उभारण्यात आलेल्या कॅम्पमधील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून या कॅम्पमध्ये दाखल असलेल्या चारशेहून अधिक नागरिकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. येथील तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. या अहवालानंतर नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांनाचा आकडा 46वर तर शहराचा आकडा ४वर गेला आहे. त्यामुळे आता नाशिककरांनी पुढील काळात अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.