नाशिक- त्रंबकेश्वरमधील गौतमी तलावातील हजारो मासे अचानक मृत पावले आहेत. कारण अद्याप अस्पष्ट असले तरी तलावातील पाणी पातळी खालावल्याने आणि वाढत्या उन्हामुळे मासे मृत पावल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
त्रंबकेश्वर येथील गौतमी तलावातील हजारो मासे मृत; कारण अस्पष्ट - गौतमी
तलावातील पाणी पातळी खालावल्याने आणि वाढत्या उन्हामुळे मासे मृत पावल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
![त्रंबकेश्वर येथील गौतमी तलावातील हजारो मासे मृत; कारण अस्पष्ट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3260942-1042-3260942-1557660025013.jpg)
मृत मासे
गौतमी तलावातील मृत मासे
नगरपालिकेन पर्यटकांच्या मनोरंजनासाठी या तलावात मासे सोडले होते. गौतमी तलाव शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सकाळपासून मृत मासे पाण्यात तरंगताना बघितले. मात्र, मृत्यू झालेल्या माशांची संख्या दुपारपर्यंत हजारोच्या घरात पोहचली. यामुळे मासे का मरत असावे, याचे अनेक तर्कवितर्क नागरिकांकडून सांगण्यात येत आहेत.