महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 6, 2020, 11:23 PM IST

ETV Bharat / city

नाशिकच्या चेहडी शिवारात गोळीबार,गोळीबारात गंभीर एक जखमी

मागील भांडणाची कुरापत काडून दुचाकीवर आलेल्या एका युवकाने एका व्यक्तीवर बंदुकीने गोळीबार करत त्याला जखमी केले, ही घटना नाशिकच्या चेहडी शिवार परिसरा घडली. या घटनेचा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

firing-took-place-in-nashik-city-area
नाशिकच्या चेहडी शिवारात गोळीबार

नाशिक -मागील भांडणाची कुरापत काडून दुचाकीवर आलेल्या एका युवकाने एका व्यक्तीवर बंदुकीने गोळीबार करत गंभीर जखमी केल्याची घटना चेहडी परिसरात सायंकाळी 5च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावेळी गोळीबाराच्या अफवा पसरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

नाशिकच्या चेहडी शिवारात गोळीबार

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सोमवारी 5 च्या दरम्यान नाशिक पुणे महामार्गावरील चेहडी शिव येथे असलेल्या वैभव गॅरेज जवळ ताजनपुरे मला येथे राहणारे विजय यशवंत खराटे (वय 45) आणि त्याचे मित्र विशाल आवारे, कैलास केनगर, प्रकाश कदम, हे आवारे याची रिक्षा (क्र एम,एच,15 झेड 7122) मध्ये गप्पा मारत असताना संशयित निलेश भाबडा आणि त्याचा एक मित्र एक दुचाकीवर आले. भाबडा याने खराटे याच्याशी मागील भांडणाची कुरापत काडून हुज्जत घातली व कमरेला असलेली बंदूक काडून खराटे यांच्या कानाजवळ बंदुकीने गोळी झाडली व पळून गेला. यावेळी उपस्थित असलेल्या खराटे यांच्या मित्रांनी त्यांना उपचारार्थ जयराम रुग्णालयात दाखल केले. ही घटना कळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला.

रुग्णालयात पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील लोहकले आदींनी धाव घेत पाहणी केली. दरम्यान घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची वाहन अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी करत चौकशी केली. यावेळीं पोलिसांनी घटनास्थळावरून एक बंदूक व काही काडतुसे हस्तगत केली आहेत. ही घटना परिसरात पसरताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परिसरात त्याच ठिकाणी पुन्हा गोळीबार झाल्याची अफवा पसरल्याने काही काळ तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details