महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये भीषण आग, अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी - Fire due to shorts circuit

पिंपळगाव बसवंत येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या बाजारपेठेतील काही दुकानांना शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत 14 ते पंधरा दुकाने जळून खाक झाली आहेत.

fire broke out neshik
पिंपळगाव बसवंत बाजारपेठेतील दुकानांना आग

By

Published : Mar 7, 2020, 10:49 AM IST

नाशिक - पिंपळगाव बसवंत येथील मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत चौदा ते पंधरा दुकाने जळून खाक झाली आहेत. शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच ओझर आणि पिंपळगाव अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शनिवारी सकाळी ७ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

पिंपळगाव बसवंत बाजारपेठेतील दुकानांना भीषण आग...

हेही वाचा...धक्कादायक! महापालिका शाळेत शाळकरी मुलींकडून केली जाते शौचालयाची स्वच्छता

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याच प्राथमिक अंदाज आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी ओझर व पिंपळगाव येथील अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न केले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकाने पुर्ण जळाल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. गेल्या सहा महिन्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची ही तिसरी घटना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details