नाशिक - शहरात सार्वजनिक ठिकाणी कोविड कायद्याचे उल्लंघन करत विना मास्क फिरणाऱ्या 18 हजार 109 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करत, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे.
नाशकात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत जिल्ह्यात 20 हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून यात सर्वाधिक रुग्ण नाशिक शहरातील आहे. तर आतापर्यंत 600 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी नाशिकच्या बाजारपेठत नागरीक गर्दी करत असून सर्रास कोविड कायद्याचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. यात अनेक जण प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे दिसत नाही.
नाशकात विनामास्क फिरणाऱ्या 18 हजार 109 जणांवर गुन्हे दाखल - nashik police news
नाशिकच्या बाजारपेठत नागरीक गर्दी करत असून सर्रास कोविड कायद्याचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. यात अनेक जण प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे दिसत नाही.
रविवारी दिनांक 9 ऑगस्टला पोलिसांनी शहरात विना मास्क फिरणाऱ्या विरोधात मोहिम उघडत 13 पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत विना मास्क फिरणाऱ्या 93 नागरिकांवर गुन्हे दाखल केले आता पर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 18 हजार 109 नागरिकांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केल्याचे नाशिक पोलीस आयुक्त कार्यालया मार्फत सांगण्यात आले आहे.
बाजारपेठ नागरिकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन..
नाशिक मुख्य बाजार पेठ असलेल्या मेनरोड, एमजीरोड, दहीपुल, रविवार कारंजा,पंचवटी या भागात असलेल्या बाजारपेठ नागरिकांची वस्तू खरेदी करण्यातसाठी गर्दी होते. या भागात असलेल्या दुकानांत सोशल डिस्टनसिंगचे कुठलेच नियम पाळताना दिसून येत नाही तर काही जण विना मास्क फिरताना दिसून येत आहे..अशीच परिस्थिती जुने नाशिक भागात दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या भागाकडे लक्ष केंद्रित केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.