महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Belgium Malinois Dog Nashik : सर्वात तरबेज बेल्जियम मेलिनोइस श्वान नाशिक पोलिसांच्या ताफ्यात दाखल

दडवून ठेवलेली स्फोटके किंवा अमली पदार्थाचा साठा शोधण्यात तरबेज असलेल्या बेल्जियम मेलिनोइस ( Belgium Malinois ) प्रजातीचे श्वान नाशिक पोलिसांच्या बॉम्ब शोधक ( Bomb Detection Squad Nashik ) नाशक पथकाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. भारतामध्ये बहुतांश पोलिसांच्या बॉम्ब शोध नाशक पथकामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन सारख्या प्रजातींच्या श्वानाचा तपासासाठी वापर केला जातो.

Belgium Malinois Dog Nashik
Belgium Malinois Dog Nashik

By

Published : Aug 9, 2022, 7:10 PM IST

Updated : Aug 9, 2022, 7:19 PM IST

नाशिक -अमेरिकी सैन्याने बेल्जियम मेलिनोइस या प्रजातीच्या श्वानाच्या मदतीने आयईएसआयचा मोरक्या अबूबकर अल बगदादीला शोधून ठार मारले होते. दडवून ठेवलेली स्फोटके किंवा अमली पदार्थाचा साठा शोधण्यात तरबेज असलेल्या बेल्जियम मेलिनोइस ( Belgium Malinois ) प्रजातीचे श्वान नाशिक पोलिसांच्या बॉम्ब शोधक ( Bomb Detection Squad Nashik ) नाशक पथकाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. भारतामध्ये बहुतांश पोलिसांच्या बॉम्ब शोध नाशक पथकामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन सारख्या प्रजातींच्या श्वानाचा तपासासाठी वापर केला जातो. मात्र या श्वानांपेक्षा कितीतरी पटीने जास्त वेगवान व दडवलेली स्फोटके बॉम्बसर्दृश्य वस्तूंचा शोध घेण्यात तरबेज असलेले ताकदवान श्वान म्हणून ओळखले जाणारे बेल्जियम श्वान नाशिक पोलीस दलात दाखल झाले. या श्वानाचे नाव पोलिसांनी अल्फा असे ठेवले आहे. हे श्वान ऑलराऊंडर म्हणून ओळखले जाते.

प्रतिक्रिया देताना पोलीस उपायुक्त

लकीला जोडीदार मिळाला :नाशिक पोलिसांच्या बॉम्ब शोधक नाशक पथकाकडे लॅब्रॉडोर जातीचे लकी हे श्वान आहे. मागच्या वर्षी त्याचा साथीदार स्निफर स्पाइक हा पोलीस दलातून निवृत्त झाला होता. त्यानंतर लकी हा एकाकी पडला होता. या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी श्वान खरेदीसाठी प्रयत्न केले. आयुक्तालयाकडून थेट फैटम कॅनाइन्सशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना नाशिक पोलिसांना थेट बेल्जियन श्वानाचे दोन महिन्यांचे पिल्लू दिले आहे. साथीदार मिळाल्याने लकी हा आनंदी झाल्याचे चित्र आहे.



...म्हणून श्वानाची होती गरज :नाशिक शहरात अत्यंत महत्त्वाची संरक्षण खात्याची केंद्र सरकारच्या संबंधित लष्करी केंद्र, नोट प्रेस, रेल्वे स्थानक, बस स्थानके, अति महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, तसेच महत्त्वाची ऐतिहासिक धार्मिक स्थळे आहेत, अशात पोलिसांना धाडसी व शक्तिशाली श्वानाची गरज होती ती आता पूर्ण झाली आहे.

'पोलीस दलाची ताकद वाढली' :बेल्जियन हे श्वान अन्य प्रजातीच्या श्वानाच्या तुलनेत अधिक सक्षम आहे. हे श्वान लवकर थकत नाही. त्याचा आयुमर्यादा ही 12 ते 14 वर्षे असते. दोन महिन्यांचे हे श्वान नाशिकच्या बॉम्बशोधक पथका करता घेण्यात आले आहे. बॉम्ब स्फोटके, अमली पदार्थ शोधण्यापासून गुन्हेगारांचा माग काढण्यापर्यंत हे श्वान तरबेज आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या व्हाइट हाऊसच्या सुरक्षेसाठी या प्रजातीच्या श्वानांना तैनात करण्यात आले आहे. या प्रजातीच्या श्वानामुळे नाशिक पोलीस दलाची ताकद वाढली असल्याचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी सांगितले.

हेही वाचा -Nagpur Police : राज्यात कुठूनही करा डायल 112; नागपूर ग्रामीण पोलिसांचा रिस्पॉन्स, राज्यात अव्वल !

Last Updated : Aug 9, 2022, 7:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details