नाशिक आदिवासी विभागाच्या कार्यकारी अभियंताला कंत्राटाच्या बदल्यात तब्बल 28 लाख 80 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. या घटनेमुळे आदिवासी विभागात खळबळ उडाली.
28 लाख 80 हजार रुपयाची लाच मागितली आदिवासी विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांनी कंत्राटदाराकडे अडीच कोटी रुपयांच्या सेंट्रल किचन कंत्राट बाबत तब्बल 28 लाख 80 हजार रुपयाची लाच मागितली होती. याबाबत कंत्राटदाराने नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. कंत्राटदाराने 28 लाख 80 हजार रुपयाची लाच देण्यासाठी बागुल यांनी तिडके कॉलनीतील एका इमारतीच्या फ्लॅट मध्ये बोलवले. त्या ठिकाणी सापळा रचून लाच लुचपत विभागाच्या पथकाने बागुल यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.या घटनेमुळे अदिवासी विभागात खळबळ उडाली आहे. दोन दिवसापूर्वीच नाशिकच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली होती.