नाशिक -नाशिकमधून मद्याची अवैध वाहतूक ( Illegal transportation of liquor from Nashik ) सुरुच असल्याचे शनिवारी पुन्हा समाेर आले. केवळ गाेवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेले मद्य नाशिकहून अवैधरित्या वाहतूक केले जात असताना नाशिकच्या उत्पादन शुल्क विभागाने ( Excise Department Nashik ) सिन्नर रस्त्यावरील माेहदरी शिवारात कारवाई करुन पकडले. या कारवाईत ३०० बाॅक्स मद्य हस्तगत करण्यात ( Confiscation of illegal liquor stock ) आले. ज्या ट्रकमधून मद्य वाहतूक केली जात हाेती, त्याला मागे, पुढे दाेन कारमार्फत संरक्षण दिल्याचे तपासात समाेर आले आहे. या दाेन कारही जप्त करण्यात आल्या असून एकूण ९ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
४५ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत -नरेंद्रसिंग ऊर्फ नरेश राजेंद्रसिंग रोतेला (रा. अहमदनगर), नारायण भगवान गिरी (रा. सातारा), सुनिल रामचंद्र कांबळे (रा. पुणे), अजय सूर्यकांत कवठणकर (रा. सिंधुदुर्ग), रविंद्र दत्तात्रय काशेगावकर(रा. पुणे), जतिन गुरुदास गावडे (रा. सिंधुदुर्ग), सतिष संतोष कळगुटकर(रा. सिंधुदुर्ग), सुभाष सखाराम गोदडे(रा. अहमदनगर) अशोक बाबासाहेब गाडे (रा. अहमदनगर) अशी संशयित मद्य तस्करांची नावे आहेत. विभागाच्या नाशिकमधील भरारी पथक एकचे निरीक्षक जयराम जाखरे यांना मद्याच्या अवैध वाहतूकीची माहिती कळाली हाेती. त्यानंतर पथकाने (दि. २३) रोजी माेहदरी शिवारातील हॉटेल सूर्याच्या बाजूला संशयास्पद वाहनांची तपासणी केली. तेव्हा आयशर टेम्पोमध्ये (एमएच ४६ एफ -२३९८) फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या ओल्ड बिल स्पेशल व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ३ हजार ६०० सिलबंद बाटल्या (३०० बॉक्स) आढळून आले. दरम्यान, या टेम्पोच्या संरक्षणार्थ क्रेटा कार (एमएच ०७ एजी - ९१९९) ही टेम्पोच्या पुढे, स्विप्ट डिझायर एमएच -१६ सीव्ही ३१९२ ही पाठीमागे वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पथकाने या कारवाईत वरील मद्यसाठा, ट्रक, दाेन कार असा ४५ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून ताे कुठून लाेड करुन काेणत्या ठिकाणी पाठविला जाणार हाेता, याचा तपास केला जात आहे.