स्मार्ट सिटीच्या 31 कोटी व्याजातून शहरात अद्ययावत हॉस्पिटल उभारावे - माजी आमदार वसंत गीते - स्मार्ट सिटी कंपनी
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या व्याजाच्या पैशाचा विनियोग नाशिकच्या विकासासाठी व्हावा, शहरात 100 खाटांचे आद्ययावत रुग्णालय उभारावे, विषाणू संबंधित उच्च दर्जाची लॅब उभारावी, अशी मागणी माजी आमदार वसंत गिते यांनी केली आहे.
माजी आमदार वसंत गीते
नाशिक- केंद्र व राज्य सरकारने स्मार्ट सिटीच्या विकासासाठी महापालिकेला निधी दिला आहे. हा निधी महापालिकेने विविध आठ बँकेत ठेवी म्हणून ठेवला आहे. त्यावर जुलै 2019 अखेर 31 कोटींचे व्याज मिळाले आहे. या व्याजातून शहरात उत्तम दर्जाचे रुग्णालय आणि अद्ययावत प्रयोगशाळा उभारली जावा, अशी मागणी भाजप नेते माजी आमदार वसंत गिते यांनी केली आहे.
Last Updated : Apr 19, 2020, 8:35 PM IST