नाशिक - शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पोलीस कर्मचारी नातेवाईकांसाठी स्वतंत्र 100 खाटांचे पोलीस कोविड सेंटरची उभारणी केली आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी या कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या कोविड सेंटरमधून बरे झालेल्या पहिल्या अकरा कोरोनामुक्त पोलिसांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
नाशिकच्या पोलीस कोविड सेंटर मधून 11 पोलीस कोरोनामुक्त... - नाशिक कोरोना पॉझिटिव्ह पोलीस न्यूज
शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पोलीस कर्मचारी नातेवाईकांसाठी स्वतंत्र 100 खाटांचे पोलीस कोविड सेंटरची उभारणी केली आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी या कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या कोविड सेंटरमधून बरे झालेल्या पहिल्या अकरा कोरोनामुक्त पोलिसांना आज डिस्चार्ज मिळाला. त्यांचे पोलीस बँड वाजवून स्वागत करण्यात आले.
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी कोरोनामुक्त पोलिसांना पुष्पगुच्छ देऊन घरी पाठवले. यावेळी पोलीस बँड वाजवून कोरोनामुक्त पोलिसांचे स्वागत करण्यात आले. एकूण 11 जणांना या कोविड सेंटरमधून घरी सोडण्यात आले. यात 7 पुरुष तर 4 महिलांचा समावेश होता. उत्कृष्ट नियोजन, उत्तम आरोग्यसेवक, पोषक आहार, आल्हाददायक वातावरण आणि विशेष म्हणजे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या रोजच्या आढाव्याने रुग्ण पूर्णपणे बरा होत असल्याचा विश्वास कोरोनामुक्त पोलिसांनी व्यक्त केला. यावेळी आयुक्त पांडेय यांच्यासह पोलीस उपायुक्त पौणिमा चौघुले, लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, विजय खरात यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -पर्यावरण रक्षणासाठी 'बेस्ट' निर्णय, ३२ इलेक्ट्रीक बस दाखल