नाशिक -मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी पैसा व दारुचा होणारा वापर टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचे एसएसटी भरारी पथक कार्यरत आहे. या पथकाने शनिवारी मध्यरात्री महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पिठुंदी चेकपोस्टवर धडक कारवाई केली. यावेळी खासगी वाहनातून तब्बल १८ लाख ९० हजार ९७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
गुजरात सीमेवर खासगी वाहनातून १९ लाखांची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई
एवढी मोठी रक्कम वाहनात आढळल्याने नेमकी कोणत्या कारणासाठी ती बाळगण्यात आली होती याबाबत शंका उपस्थित होत आहे.
भरारी पथकाने पेठ तालुक्यातील पीठुंदी नाका या ठिकाणी मध्यरात्रीतून सुरतहून येणारी (क्रेटा एम एच १५ जीआर ४०००७ ) या वाहनाची तपासणी केली. यावेळी त्यात रोकड सापडली. वाहनात विनायक खरात आणि प्रदीप शेटे (रा.चांदोरी ता. निफाड ) हे दोघे होते. हा भाग दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येतो.
एवढी मोठी रक्कम वाहनात आढळल्याने नेमकी कोणत्या कारणासाठी ती बाळगण्यात आली होती याबाबत शंका उपस्थित होत आहे. निवडणूक शाखेने याबाबत माहिती दिल्यानंतर आयकर विभागाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. ही रक्कम कुठे घेऊन चालले होते, कोणाकडे रक्कम चालली होती, याबाबत आयकर विभाग चौकशी करत आहे. ही रोकड निवडणुकीसाठी वापरली जाणार होती का, अशी शंका उपस्थित होत आहे. निवडणुकीत मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैसा, दारू यांचा वापर होऊ शकतो हे लक्षात घेता निवडणूक आयोगाने भरारी पथक कार्यन्वित केलेले आहेत.