महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा, पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटिसा - Shiv Sena aggressive against Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना आक्रमक ( Shiv Sena aggressive against Shinde ) झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौरा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडवू नये म्हणून पोलिसांनी नाशिकच्या शिवसैनिकांना नोटिसा ( Notices to Shiv Sainiks from Nashik Police ) दिल्या आहेत.

Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Jul 29, 2022, 5:13 PM IST

नाशिक -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्तांने पोलिसांनी शिवसैनिकांना नोटिसा ( Notices to Shiv Sainiks from Nashik Police ) दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर येत ( Eknath Shinde visit to Nashik ) आहेत. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून नाशिक शहरातील शिवसैनिकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. शहरातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नाशिक पोलिसांकडून शहरातील शिवसैनिकांना 149 अंतर्गत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

शहरात मनाई आदेश लागू -एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली, त्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक ( Shiv Sena aggressive against Shinde ) झाली आहे. अशात नाशिकमध्ये शिवसैनिकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्यावेळी शिवसैनिक पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी शहरात मनाई आदेश लागू केला आहे. अशात पोलिसांनी आठ दिवसानंतर निलेश कोकणे यांच्यावर हल्ला करणारे चार हल्लेखोर अटक केलेत. मात्र, तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

नाशिकच्या शिवसैनिकांना नोटीस

हेही वाचा -Smriti Irani Plea : दिल्ली कोर्टाचे कॉंग्रेस नेत्यांना समन्स; स्मृती इराणीच्या मुलीबद्दलच्या सोशल मीडियावरील पोस्ट काढून टाकण्याचे दिले आदेश

काय आहे नोटीसमध्ये -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्या दरम्यान आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांकडून आंदोलन, मोर्चा किंवा कुठलाही अनुचितकृत्य घडून आल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नाशिक पोलिसांकडून शहरातील शिवसैनिकांना 149 अंतर्गत नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत, ठाण्यातील न्यायालयात याचिका दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details