महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक; विद्युत डीपीचा धक्का लागून आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - उघड्यावरील डीपी समस्या

नाशिक-पुणे रोडवरील हॅप्पी होम कॉलनी परिसरात अरमान मुन्ना अन्सारी हा आठ वर्षाचा मुलगा रविवारी 26 जून रोजी खेळत होता. अशातच विद्युत विभागाकडून लावण्यात आलेल्या उघड्यावरील विद्युत डीपीतीच्या ( electric shock of DP ) वायरचा त्याला धक्का लागल्याने अरमान गंभीर जखमी झाला.

अरमान मुन्ना अन्सारी
अरमान मुन्ना अन्सारी

By

Published : Jul 3, 2022, 7:03 AM IST

नाशिक- उघड्यावरील विद्युत डीपीतील विद्युत प्रवाहाचा धक्का लागून आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू ( Eight year old boy dies ) झाला आहे. अरमान मुन्ना अन्सारी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. नाशिक-पुणे रोडवरील हॅप्पी होम कॉलनीत ही घटना ( kid death due to DP in Nashik ) घडली आहे. या घटनेने शहरातील उघड्यावरील विद्युत डीपींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार नाशिक-पुणे रोडवरील हॅप्पी होम कॉलनी परिसरात अरमान मुन्ना अन्सारी हा आठ वर्षाचा मुलगा रविवारी 26 जून रोजी खेळत होता. अशातच विद्युत विभागाकडून लावण्यात आलेल्या उघड्यावरील विद्युत डीपीतीच्या ( electric shock of DP ) वायरचा त्याला धक्का लागल्याने अरमान गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान अरमानचा मृत्यू झाला. या घटनेने नाशिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. विद्युत डीपींना भिंत बांधावी अशी मागणी होत आहे.

विद्युत डीपी
अनेक डीपी उघड्या- नाशिक शहरात अनेक भागांमध्ये विद्युत विभागाकडून लावण्यात आलेल्या हाय होल्टेज डीपीनां संरक्षण भिंत बांधण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील लहान मुलांचे जीव धोक्यात आले असल्याचे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष अजित पठाण यांनी म्हटले आहे. घटनेला दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवेदन मराठा मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने देण्यात विद्युत विभागाला देण्यात आले आहे.

हेही वाचा-Assembly Speaker Election : जर आमदारांनी 'व्हीप'नुसार मतदान नाही केलं तर?, असीम सरोदे म्हणतात...

ABOUT THE AUTHOR

...view details