महाराष्ट्र

maharashtra

नाशिककरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार पर्यावरणपूरक बसेस

प्रवासी वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन असणाऱ्या 250 बसेस शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी टप्प्याटप्प्याने लवकरच सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.

By

Published : Jul 4, 2021, 3:01 PM IST

Published : Jul 4, 2021, 3:01 PM IST

इको फ्रेंडली बसेस
इको फ्रेंडली बसेस

नाशिक -शहरामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व महानगरपलिकेअंतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन असणाऱ्या 250 बसेस शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी टप्प्याटप्प्याने लवकरच सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.

10 वर्षाचा करारनामा

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात शहर बस सेवेसाठी मे. ट्रॅव्हल टाइम कार रेन्टल प्रा. लि. पुणे यांच्यामार्फत 120 सीएनजी बसेस व मे. सिटी लाइफ ट्रॅव्हल्स प्रा. लि. दिल्ली यांच्यामार्फत 20 डिझेल व 80 सीएनजी पर्यावरणपूरक बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. या दोन्ही कंपनीमार्फत ऑपरेटर्सची नेमणूक करण्यात आली असून, बस ऑपरेटरसोबत बसची खरेदी, व्यवस्थापन, संचालन व देखभालीसाठी 10 वर्षाचा करारनामा करण्यात आला आहे.

शहरातील 146 मार्गांवर बस सेवा

नाशिक महानगर परिवहन महामंडळ यांनी नाशिक शहर व परिसरात एकूण 250 बसेसद्वारे शहर बससेवा चालू करण्यासाठी 146 विविध मार्गांवर वाहतुकीस परवाना मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील त्रिस्तरीय समितीच्या परिचलन पद्धतीने शहरात महानगरपलिका हद्दीत व या हद्दीच्या पलिकडील 20 किलोमीटर परिसरात 146 मार्गांवर वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बस भाडे निश्चित

बस सेवेसाठी किमान व कमाल दरांच्या अनुषंगाने 0 ते 2 किमीपर्यंत रुपये 10 पूर्ण आकार व रुपये 5 अर्धा आकार तसेच कमाल 50 किमीपर्यंतच्या टप्प्यास रुपये 65 पूर्ण आकार व रुपये 35 अर्धा आकार याप्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना कमी दरात चांगल्या प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

पर्यावरणपूरक बस सेवा

सार्वजनिक शहर परिवहन बस सेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे पर्यावरणपूरक इंधन असलेल्या व कमीत कमी दरात जलद सार्वजनिक बस सेवेची सुविधा नाशिक शहरातील जनतेसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details