महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बनावट मद्य प्रकरण: 'लिकर किंग' पाठोपाठ राधाकृष्ण विखेंच्या अडचणी वाढणार?

बनावट मद्यसाठा प्रकरणात सापडलेला लाखो रुपयांचा माल हा नगर येथील विठ्ठलराव विखे पाटील मद्य कारखान्यातून आल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. संबंधित बाब खरी ठरल्यास भाजपा नेते राधाकृष्ण विखेंच्या अडचणी वाढू शकतात.

duplicate liquor selling in nashik
बनावट मद्य प्रकरण: 'लिकर किंग' पाठोपाठ राधाकृष्ण विखेंच्या अडचणी वाढणार?

By

Published : Dec 4, 2020, 3:53 PM IST

नाशिक - बनावट मद्यसाठा प्रकरणात सापडलेला लाखो रुपयांचा माल हा नगर येथील विठ्ठलराव विखे पाटील मद्य कारखान्यातून आल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. या प्रकारणी विठ्ठलराव विखे पाटील मद्य कारखान्यातून मद्याचे सॅम्पल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्याची माहिती नाशिक उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

बनावट मद्य प्रकरण: 'लिकर किंग' पाठोपाठ राधाकृष्ण विखेंच्या अडचणी वाढणार?

काही दिवसांपूर्वी अवैद्य मद्य वाहतूक करणारा ट्रक नाशिक ग्रामीण पोलिसांनी पकडला होता. या ट्रकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये लाखो रुपयांचा बनावट मद्यसाठा सापडला. हा मद्यसाठा नाशिकचा लिकर किंग अतुल मदन याच्या वाइन शॉपवर जाणार असल्याचे तपासात समोर आले. यानंतर नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अतुल मदनच्या मालकीचे जिल्ह्यातील 14 वाइन शॉप सील केले.

तसेच अतुल मदनवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र हा बनावट मद्यसाठा नगर येथील विठ्ठलराव विखे पाटील मद्य कारखान्यातून आल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. यामुळे विखे यांच्या कारखान्यातील मद्याचे सॅम्पल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांमध्ये साधर्म्य आढळल्यास उत्पादन शुल्क विभाग विखे पाटील कारखान्याच्या मालकांची चौकशी होणार आहे.

काही दिवसांपूर्वी अवैद्य मद्य वाहतूक करणारा ट्रक नाशिक ग्रामीण पोलिसांनी पकडला होता.

गिरीश महाजनांच्या पाठोपाठ भाजपाचे विखे पाटील अडचणीत

जळगाव बीएचआर घोटाळ्याप्रकरणी भाजपाचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अडचणीत आल्यानंतर त्या पाठोपाठ आता जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये सापडलेलं बनावट मद्याचं घबाड त्यांच्या गळ्यात येऊ शकतं. बनावट मद्यप्रकरणात विखे यांची येणाऱ्या काळात चौकशी देखील होऊ शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details