नाशिकनाशिक मध्ये पावसाची ये जा सुरू असून वातावरणात रोज बदल होत आहे. त्यामुळे due to climate change साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यातच शितलहरींमुळे सर्दी, खोकला, ताप या साथीच्या आजारांमध्ये वाढ Fear of epidemics झाली आहे. बदलत्या हवामानामुळे लहान मुलांना साथीच्या आजार होण्याची शक्यता अधिक असते. तसेच दूषित हवेमुळे न्यूमोनिआ, बालदमा याचे प्रमाण वाढते. तसेच घराचा परिसर दूषित असेल तर डास, माशांचे प्रमाण वाढते आणि यामुळे मलेरिया,डेंग्यू आजराचा प्रादुर्भाव वाढतो.
पावसाळ्यात लोक निसर्ग पर्यटना साठी घराबाहेर पडतात. सुट्टीचा दिवस साधून अनेक जण थंड हवेच्या ठिकाणी, धबधबा, डोंगर परिसरात पर्यटनासाठी जातात, अशावेळी काळजी घ्यावी असा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. पावसाळयात बहुतांश साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतो, अशात घरातील लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, शक्यतो घरातीलच अन्नपदार्थ खावे बाहेर चे अन्न टाळावे, उबदार कपडे घालावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरात आणि घराबाहेर पडतांना नागरिकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे..