महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सरकारची पावले सकारात्मक; सप्टेंबरपासून कोरोना कमी होण्याची शक्यता - डॉ. तात्याराव लहाने - nashik corona update news

ते म्हणाले, नागरिकांनी आपला केवळ अधिकार आणि हक्क लक्षात ठेवू नये. कर्तव्य सुद्धा लक्षात ठेवावे. नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात मास्क वापरलेच पाहिजेत. मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणाहून करोना कमी होत असल्यामुळे शासनाची पावले सकारात्मक रित्या पडत आहेत.

dr tatyrao lahane say corona decrease from september in india
dr tatyrao lahane say corona decrease from september in india

By

Published : Aug 12, 2020, 2:49 PM IST

नाशिक -साधारण ऐंशी वर्षांपूर्वी आलेल्या प्लेगच्या साथीनंतर संपूर्ण जगभरात आलेला कोरोना आजार अंगावर काढू नये. अन्यथा विशिष्ट तापाची लागण होऊन हा आजार जीवावर बेततो, असा इशारा राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला. सप्टेंबरपासून राज्यात हा आजार कमी होण्याची शक्यता वर्तवणारी दिलासादायक बाब ही डॉ. लहाने यांनी 'आरोग्य चिंतन' फेसबुक लाईव्ह वेबिनार माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना सांगितली.

'जनतेच्या आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवांची भूमिका' या विषयावर डॉ. लहाने यांनी आरोग्य चिंतन वेबिनार व्याख्यानमालेत आपले विचार मांडले.

ते म्हणाले, की कोणताही आजार अचानक आल्यानंतर शासन यंत्रणा प्रभावी पणे कशी कार्यरत होते ते आपण अनुभवत आहोत. लॉकडाऊनचा निश्चितच मोठा उपयोग झाला. यामुळे रुग्णांची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाली. राज्यात गेल्या दीड महिन्यांपूर्वी तीन करोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा होत्या. तीन वरून आता ही संख्या 144 प्रयोगशाळा पर्यंत करण्यात आली आहे. यापैकी राज्यात सध्या 71 खासगी प्रयोगशाळा असून उर्वरित सर्व शासकीय प्रयोगशाळांमध्ये करोनाची मोफत चाचणी केली जाते. सध्या करोना शहरी भागापासून ग्रामीण भागांमध्ये पाय पसरत असल्याबाबत त्यांनी नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले.

पुढे ते म्हणाले, नागरिकांनी आपला केवळ अधिकार आणि हक्क लक्षात ठेवू नये. कर्तव्य सुद्धा लक्षात ठेवावे. नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात मास्क वापरलेच पाहिजेत. मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणाहून करोना कमी होत असल्यामुळे शासनाची पावले सकारात्मक रित्या पडत आहेत.

सहकार क्षेत्रातील डोंबिवली नागरी बँकेने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी योजना तयार केली असून याबाबत बँकेचे ज्येष्ठ अधिकारी उदय पेंडसे यांनी विशद केलेल्या माहितीवर डॉ. लहाने यांनी अशा सुविधेचा करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना चांगला उपयोग होऊ शकेल असे मत व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details