नाशिक - शहरातील मोहम्मदिया सोशल ग्रुपने देवळाली गावात मालेगावच्या डॉक्टरांना पाचारण करत तीन दिवसांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच शहरातील वडाळा, जुने नाशिक, पंचवटी या भागात देखील नागरिकांची तपासणी सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत 2500 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर उपचार झाले आहेत. सर्दी, खोकला, तापाची कमी प्रमाणात लक्षणे असल्यास त्या रुग्णाला 'मंसुरा काढा' देण्यात येतोय.
दिवसेंदिवस मालेगावातील कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत होती. मात्र, कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर मदतीचा हात पुढे आला. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने स्थनिक डॉक्टरांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मालेगावात प्रयत्न यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. एकेकाळी मालेगावातील बाधितांच्या आकड्यामुळे प्रशासन चिंतेत होते. मात्र, काही दिवसांनंतर मालेगावातील आकडा ओसरला आणि मुख्य शहरात बाधितांची संख्या वाढली. सध्या नाशिक शहरात दररोज १५० ते २०० नवे पॉझिटिव्ह सापडत आहेत. शहरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारावर जाऊन पोहोचला असून 188 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे.
'मंसुरा काढा'