महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Doctor Raped Minor Nurse: डॉक्टरने केला अल्पवयीन परिचारिकेवर अत्याचार, पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल - पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

नाशिक मध्ये एका डॉक्टरने खासगी रुग्णालयात प्रशिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन परिचारीकेवर अत्याचार (Doctor Raped minor nurse) केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (case registered under POSCO Act) करण्यात आला. पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Doctor molested nurse
अल्पवयीन परिचारिकेवर अत्याचार

By

Published : Sep 12, 2022, 1:11 PM IST

नाशिक परिचारीकेवर अत्याचार (Doctor Raped minor nurse) केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (case registered under POSCO Act) करण्यात आला. पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सिडको भागातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून अल्पवयीन परिचारिका कामास आहे, त्याच ठिकाणी संशयित डॉ. उल्हास पांडुरंग कुटे (५० रा,मोरवाडी ) हे शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये गेले. यावेळी त्या ठिकाणी एक सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिका होती. रूममध्ये एकटी असल्याचे निमित्त साधून, कुटे यांनी हातपाय दुखत असल्याच्या निमित्ताने तिच्या रूमच्या आत प्रवेश करीत, दरवाजाची कडी लावून डॉक्टर कुटे यांनी पीडित परिचारिकेवर अत्याचार केले.


बलात्काराचा गुन्हा दाखलयानंतर झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास पीडितेला कामावरून काढून टाकण्याची धमकी डॉक्टर ने दिली .या प्रकरणी पीडित परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याच्याविरोधात भा.द.वी. कलम 376, 504, तसेच लैंगिक अत्याचार संरक्षण पोस्को कायद्याअंतर्गत आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल फडोळ करीत आहेत. Doctor molested nurse

ABOUT THE AUTHOR

...view details