नाशिक -हिजाब प्रकरणावर देशात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर राज्याचे अन्नपुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत मांडले ( Chhagan Bhujbal On Hijab Controversy ) आहे. शांततेने सत्याग्रह करण्याचा अधिकार सर्वांना आहे. माझी विनंती आहे, शांततेने मत मांडा कुठेही हिंसाचार होणार नाही याची काळजी घ्या. शाळा - कॉलेज मध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्माचे विष पेरण्याचा काम करू नका, असा इशारा भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांनी दिला आहे.
भुजबळ फार्म येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातेमा शेख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर गेलं पाहिजे. देशातील मोठ्या नेत्यांना माझी विनंती आहे की, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम आपण केले पाहिजे. आपले मत शांततेने मांडा, अशी विनंतीही त्यांनी केली.