महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशकात डिजेशिवाय रंगपंचमी; पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली

कोरोनाचे नियम शिथिल केल्याने यंदा दोन वर्षानंतर नाशिककरांना रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. मात्र यंदाच्या वर्षी रंगपंचमीला डीजे वाजवण्यास मनाई असल्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी दिले आहेत.

DJ is not allowed in Rangpanchami in Nashik
नाशकात रंगपंचमीला डिजेला परवानगी नाही

By

Published : Mar 22, 2022, 12:33 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचे नियम शिथिल केल्याने यंदा दोन वर्षानंतर नाशिककरांना रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. मात्र यंदाच्या वर्षी रंगपंचमीला डीजे वाजवण्यास मनाई असल्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी दिले आहेत.

महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडला रंग खेळला जातो. मात्र नाशिक मध्ये रंगपंचमी जोरदार खेळली जाते, नाशिकला रहाड संस्कृती असून यावेळी मोठ्या प्रमाणात नाशिककर रंगपंचमीचा आनंद घेतात. ठिकठिकाणी डीजेच्या तालावर तरूणाई थिरकतांना दिसून येते. मात्र यंदा पोलीस आयुक्तांनी डिजेला परवानगी नाकारल्याने तरूणाईची काहीशी निराशा झाली आहे. मात्र डिजेला परवानगी नसली तरी पारंपरिक वाद्य वाजवण्यास मुभा देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details