नाशिक- येथील पारस लोहाडे यांनी डिजिटल व्हिजिटिंग कार्ड साकारले आहे. कागदाच्या व्हिजिटिंग कार्डला पर्याय म्हणून साकारण्यात आलेल्या या डिजिटल व्हिजिटिंग कार्डमुळे कागदाचा वापर टाळून पर्यावरणाच्या संवर्धनाला हातभार लागणार आहे
पाहा 'डिजिटल व्हिजिटिंग कार्ड'... नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक आपली माहिती दुसऱ्याला देण्यासाठी कागदी व्हिजिटिंग कार्डचा वापर करतात. हा कागद बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड केली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान होत आहे. यावर पर्याय म्हणून नाशिकच्या पारस लोहाडे यांनी डिजिटल व्हिजिटिंग कार्ड साकारले आहे.
विशेष म्हणजे, कागदी व्हिजिटिंग कार्डपेक्षा अधिक प्रमाणात माहिती डिजिटल व्हिजिटिंग कार्डमध्ये समोरील व्यक्तीस देता येऊ शकते. त्यातून व्यापार, उद्योगाच्या वाढीलादेखील फायदा होऊ शकतो. तसेच कागदी व्हिजिटिंग कार्ड खिशात सांभाळून ठेवण्याची गरज नाही. पाण्याने खराब होण्याची भीती नाही. डिजिटल कार्डमुळे तुम्ही तुमची माहिती जगाच्या पाठीवर कुठल्याही व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकते, असे लोहाडे यांनी सांगितले आहे.
काय आहे हे डिजिटल व्हिजिटिंग कार्ड
- -डिजिटल व्हिजिटिंग कार्ड हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून इतरांना पाठवू शकतात
- -डिजिटल व्हिजिटिंग कार्डच्या नंबरवर क्लीक केल्यावर लागणार कॉल
- -घर आणि ऑफिसचे गुगल लोकेशन
- -मेल आयडीवर क्लिक केले तर मेल ओपन होणार
- -मोबाईल नंबर सेव नसला तरी व्हॉटस अॅपवर कार्ड पाठवण्याची सुविधा
- -मेसेजवर क्लिक केले तर मेसेज सेंड करता येऊ शकतो
- -यु ट्यूब व्हिडिओदेखील एका क्लिकवर होणार उपलब्ध
- -स्वतःची माहिती सविस्तर लिहता येऊ शकते
- -आपल्या उत्पादनाचे 10 प्रॉडक्ट इमेज दाखवता येऊ शकतील